पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे आभासी उद्घाटन कार्यक्रम संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वर्धा येथे राज्यातील विविध कौशल्य कार्यक्रम व योजना आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यासाठी उपस्थित होते. या योजनेचा समाजातील विविध क्षेत्रातील कौशल्य शिकणारे व प्रात्यक्षिकांना होईल.

कामठी फार्मसी महाविद्यालय येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान उपक्रमाअंतर्गत स्थापन केले आहे. डॉ. मिलिंद जे. उमरेकर, संस्थेचे प्राचार्य आणि APTI चे राष्ट्रीय अध्यक्ष, नव्याने स्थापन केलेल्या ACKVK चे केंद्र प्रमुख म्हणून काम करतील. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीद्वारे राज्य पातळीवर आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे क्षेत्रीय स्तरावर केली जाईल. या योजनेअंतर्गत विद्यार्थी MSSDS पोर्टलद्वारे नावनोंदणी करतील आणि क्षेत्र कौशल्य परिषद आणि राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने – NSDC ने दिलेल्या मॉड्यूल आणि तासांच्या संख्येनुसार प्रशिक्षित केले जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व्होकेशनल परीक्षा मंडळाद्वारे संस्थेत होईल. पात्र विद्यार्थ्यांना MSSDS द्वारे प्रमाणपत्र दिले जाईल आणि उमेदवारांच्या नियुक्तीत मदत केली जाईल. कामठी फार्मसी महाविद्यालयात स्थापन केलेल्या ACKVK केंद्रांतर्गत, फार्मास्युटिकल आणि जीवन विज्ञान क्षेत्रातील शिकणाऱ्यांच्या रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास कार्यालयातून सी.डी. लामखाडे यांची या आभासी उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. डॉ. मनीष अगलावे आणि डॉ. मयूर काळे यांची ACKVK अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी SPOC म्हणून नेमणूक करण्यात आली.

या अधिकृत उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे संशोधन तथा मान्यता विभागाचे अधिष्ठाता डॉ. ब्रिजेश ताकसांडे, शैक्षणिक विभागाचे अधिष्ठाता डॉ. दिनेश बियाणी, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. राधेश्याम लोहिया, परीक्षा व मुल्यांकन विभागाच्या डॉ. जयश्री ताकसांडे, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या डॉ. रश्मी त्रिवेदी, IQAC समन्वयक डॉ. कृष्णा गुप्ता तसेच इंडस्ट्रीयल फार्मसी विभागप्रमुख डॉ. निशांत आवंडेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. मनीष अगलावे यांनी विद्यार्थ्यांना योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रुची बजाज खोब्रागडे यांनी केले तसेच तांत्रिक व्यवस्थापन कुशलतेने प्राध्यापिका नितू वानखडे यांनी सांभाळले . या कार्यक्रमाचे आभार डॉ. मयूर काळे यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुरी अहमदाबाद एक्सप्रेस च्या धडकेने विवाहित तरुणाचा अपघाती मृत्यु

Fri Sep 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे मार्गावरील रेल्वे किमी क्र 1115/11 वर नागपूर कडे जात असलेल्या पुरी एक्सप्रेस च्या धडकेने एका विवाहित तरुणाचा रेल्वे अपघाती होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सुरेश डायरे वय 40 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कामठी असे आहे. .घटनेची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com