नागपूर :- पाचपावली पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, पोलीस ठाणे हरीत चिराग अली चौक, टेका नाका वस्ती, पाचपावली, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, त्या ठिकाणी हालचाल करता येणार नाही अशा एका बंद खोलीत एकुण ०४ जिवंत गोवंशीय जनावरे किंमती अंदाजे ९०,०००/- रू. चे यांना निदर्यतेने कोंबुन अवैधरित्या कत्तलीकरीता बांधुन ठेवल्याचे दिसुन आले. परिसरात आजुबाजुला विचारपूस केली असता, नमुद मकान हे मुकीन कुरेशी नावाच्या ईसमाचे असल्याचे समजले. घटनास्थळावरून ०४ गोवंशीय जनावरे यां’ची सुटका करून, गोरक्षण समित्ती, नागपुर येथे पाठविण्यात आले. पाहिजे आरोपी मुकीन कुरेशी याचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी पोहवा, किशोर गरवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे पोउपनि. सुनिल तिडके यांनी पाहिजे आरोपी विरूध्द कलम ५(अ), ५(व), ९, ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५, सहकलम ११(ई) (फ) प्राणी करता अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास करीत आहे.