बेला :- बेला पोलीस यांनी दि. ११/०९/२०२४ चे सकाळी ११/१५ वाजे दरम्यान गोपनीय माहीती मिळवुन अवैध्य व विनापरवाना (रॉयल्टी) रेती वाहतुक करणाऱ्या आरोपी नामे सागर ट्तुजी पावसे वय २८ वर्ष रा. बेला ता. उमरेड जि. नागपुर हा आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर कमांक MH 40/CA-3266 हा बेला सोनेगाव येथे अवैध्य व विनापरवाना वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने सदर आरोपीविरूध्द कलम ३०३(२) बी.एन.एस., सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ सहकलम ४, २१ खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान पासुन प्रतिबंधक अधिनियम १९८४ नुसार कायदेशीर कार्यवाही करून एकुण १) एक सोनालीका कंपनीची निळ्या रंगाची ट्रॅक्टर मुंडा क्र. MH 40 CA 3266 किंमती अंदाजे ४,००,०००/- रूपये, २) एक हिरव्या रंगाची ट्रॉली क्र. MH 32 CA 2383 किंमती अंदाजे १,००,०००/- रूपये ३) ०१ ब्रॉस रेती ५०००/- रूपये असा एकुण ५,०५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोहार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक अग्रवाल (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सी. वी. चौहान सा., पोउपनि संतोष चव्हाण, स. फौ. सुनिल आदमने, पोशी श्रीधर कुलकर्णी यांनी केली आहे.