उपासनेने देव कळतो ‘ – शेषानंद महाराज

– बरबडी येथे ग्रामगीता ग्रंथ पारायण अनु्ष्ठाण समाप्ती

बेला :- ध्यान, ग्रंथ पारायण,साधना व उपासनेने देव कळतो. म्हणून नित्यनेमाने ग्रंथ पारायण व ध्यान करा अध्यात्माचे केंद्र हे संत आहे. असे मौलिक मार्गदर्शन सद्गुरु ब्रह्ममूर्ती शेषानंद महाराज यांनी भक्तांना केले. ते बरबडी येथील आदिनाथ गुरु माऊली सेवाश्रमात आयोजित ग्रामगीता ग्रंथ पारायण अनुष्ठानच्या समाप्ती प्रसंगी बोलत होते. यावेळी पारायणाचार्य रवींद्र गाडगे (बुटीबोरी), अनिल खामनकर(चिचाळा),अर्चना सुपारे (वाघोली), प्रजत उमरे (सावंगी)व ओमप्रकाश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

श्रावण मास निमित्त बरबडी येथील सेवाश्रमात 4 ऑगस्टपासून 9 सप्टेंबर पर्यंत ग्रामगीता ग्रंथ पारायण व अनुष्ठान चे आयोजन करण्यात आले होते. त्याची समाप्ती नुकतीच भक्तीमय व उत्साही वातावरणात पार पडली.

सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाला सुरूवात झाली नतंर आदिनाथ गुरू माऊली पुजन व श्री ग्रामगीता ग्रंथाचे पुजन करून अध्याय 41 ग्रंथ महिमाचे पारायण करण्यात आले. विवेक व स्वाती दाम्पत्यांनी सदगुरू शेषानंदबाबा व गुरूआई मंदाताई पांडे यांचे पूजन केले.

सदगुरू शेषानंद महाराज यांचे ग्रामगिता व शिवमहीमा विषयावर भाविक मंत्रमुग्ध झाले होते, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. स्व-सरूपाची ओळख करून जिवनाचे सार्थक करा असे, मोलाचे मार्गदर्शन सुद्धा यावेळी शेषानंद महाराजांनी केले. ह भ प पाडुरंग लाबंट महाराज यांचे ब्रम्हवानीतुन काल्याचे किर्तन पार पडले.आरती, गोपाल काला व भव्य महाप्रसादाने कार्यक्रमाचे सागंता झाली. संचालन अमोल श्रीखंडे यांनी केले. आश्रमचे अध्यक्ष ओमप्रकाश पांडे यांनी प्रास्ताविक केले, सचिव प्रभुजी दोडके यांनी उपस्थित यांचे आभार मानले. समाप्तीचे यशस्वीतेसाठी आदिनाथ गुरू माऊली सेवा मंडळाचे पुजाराम खिरटकर,रामप्यारी चंदेल, श्रीकृष्ण खामनकर,प्रभाकर राऊत,जानराव साकरकर,शंकर कोपरे,पंकज,कमला भेंडे,सुदंर निमसडे,जगन्नाथ जांभुळे, शेषराव पोटदुखे यांनी अथक परीश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कडाजना येथे रामचंद्रबाबांचा समाधी सोहळा

Thu Sep 12 , 2024
– शनिवारला निघणार पालखी दिंडी – सोमवारला भव्य महाप्रसाद बेला :- पंचक्रोशीतील प्रख्यात संत बालयोगी संत रामचंद्र महाराज यांचा समाधी सोहळा नजीकच्या कडाजना टेकडीवरील आश्रमात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने गेल्या 9 सप्टेंबर पासून अखंड हरिनाम जपाचा धार्मिक सप्ताह सुरू झाला आहे.शनिवारला (ता 14) महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी दिंडी यात्रा कडाजना येथून बेला गावाकडे निघणार आहे. तेव्हा असंख्य भक्तांची मांदियाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com