शिवसेना एकनाथ शिंदे गट मोवाड तर्फे तान्हा पोळा साजरा

– उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम धोटे यांची प्रमुख उपस्थिती

नरखेड :- मोवाड शहरात शिवसेना पार्टी एकनाथ शिंदे गटातर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन दि. ५ सप्टेंबर गुरुवारला ५ वाजता आठवडी बाजार मोवाड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम धोटे विधानसभा संघटक काटोल, प्रितेश लोंढे तालुका प्रमुख ,अजय बालपांडे ,विशेष अतिथी मोवाड न.प. मुख्याधिकारी अमोल परिहार शिवसेना मोवाड शहर प्रमुख निरज कळंबे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या पक्षाचे तान्हा पोळा भरर्विण्याचे पहिले वर्ष असून मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले. प्रथम बक्षीस ३,३०० रुपये , द्वितीय बक्षीस ३,६०० रुपये, तृतीय बक्षीस ३,५०० रुपये, चौथे बक्षीस ३,५०० रुपये, पाचवे बक्षीस ३,६०० रुपये ,असे एकूण ३१ बालगोपालांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.१७,५०० रुपये रोख बक्षीस देण्यात आली तर काही प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आली. शिवसेना पक्षाचे पदाधिकारी नितीन गुरु ,लंकेश मस्के ,विनोद सोरते, छममु पटेल, प्रवीण नंदनवार, मकसूद अंसारी, तुळशीराम वालुरकर, प्रवीण लुंगे, संजय शिरसागर, दर्शन कळंबे, माजी सैनिक रमेश नरेटे ,भूषण ठाकरे ,पांडुरंग वाघे ,छत्रपती ठोंबरे ,सुरेश ढेपले ,शेखर राजगुरू, रवी इंगोले ,शंकर दारोकर, आदींनी बक्षीस करिता सहकार्य केले. आयोजक शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) मोवाड शहर प्रमुख निरज कळंबे, उपशाखाप्रमुख नरेंद्र सातपुते , उपशाखाप्रमुख रफिक शेख, विभाग प्रमुख धनराज कांबळे, विभाग प्रमुख रमेश कळंबे,आदी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) पदाधिकारी यांनी कार्यक्रमाकरिता अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

२५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी

Mon Sep 9 , 2024
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने २५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असुन सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. शहरात मुख्यतः दीड दिवस, ५ दिवस तसेच १० दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com