थॅलेसेमिया, सिकलसेल या रुग्णांकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन

– बाळासाहेब मांगुळकर यांची प्रमुख उपस्थिती.

यवतमाळ :- थॅलेसेमिया, सिकलसेल,हिमोफेलिया या रुग्णांकरिता नियमित रक्तांची आवश्यकता भासते. जिल्ह्यात या बिमारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांना जीवन जगण्याकरिता नियमित संघर्ष करावा लागत आहे. या बिमारीच्या रुग्णांना औषध उपचार व रक्त नियमित न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रक्त साठ्याची कमतरता असल्याने नागरिकांमधून स्वयंस्फूर्तीने या रुग्णांकरिता रक्तदान देण्या करीता अंबा माता देवस्थान अप्सरा टॉकीज चौक यवतमाळ येथे दि. ९ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ०९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले असून या शिबिराला प्रमुख उपस्थिती बाळासाहेब मांगुळकर यांची असल्याची माहिती थॅलेसिमिया व सिकलसेल संघटनेचे अध्यक्ष शुभम बजाईत यांनी माहिती दिली.

या आजाराच्या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करणे गरजेचे असते या सर्व रुग्णाला महिन्याला १५० ते २०० बॅग रक्ताची आवश्यकता भासते. जिल्ह्यातील सर्व रक्तपेठी मध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे ही अवस्था अतिशय बिकट असल्याने विविध सामाजिक संघटनांनी व राजकीय नेते यांनी सामाजिक भान ठेवून अश्या शिबिराचे आयोजन केले आहे. या माध्यमातून रक्तपेठीना रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यात येतो त्याकरिता नागरिकांनी रक्तदाना करिता सामोर येऊन रक्त देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता असल्याने रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यास तसेच सिकलसेल च्या रुग्णांना दर दोन ते तीन महिन्यांनी तर थॅलेसिमिया रुग्णांना२१ दिवसांनी नियमित रक्ताची आवश्यकता भासते हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी ठराविक कालावधीनुसार रक्त चढविणे गरजेचे असते. जिल्ह्यात या रुग्णांची संख्या मोठी असल्याने स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये रक्त घेण्याकरिता त्यांना नियमित यावे लागते. यामुळे उपरोक्त सर्व आजाराच्या रुग्णांना रक्तपुरवठा करणे शक्य होत नसल्याने अशा प्रकारचे शिबिरे घेऊन रक्त साठा वाढविणे काळाची गरज आहे.

– शुभम बजाईत, अध्यक्ष सिकलसेल,थॅलेसिमिया संघटना.

या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाला जिल्ह्यातील सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील रक्तपेटीसह जिल्ह्यातील सर्व रक्तपेटींना रक्ताचा पुरवठा करण्यात यावा. रक्तपेढीत जमा करण्यात आलेल्या रक्त केवळ ३५ दिवस पर्यंत टिकून राहते त्यामुळे एकाच दिवशी रक्तदान शिबिर न घेता योग्य नियोजन करून आठवड्यातून किंवा पंधरवड्याच्या फरकाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात यावे जेणेकरून या रुग्णांकरिता रक्ताचा तुटवडा होणार नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथे 'ईद-ए-मिलाद २०२४" सणानिमित्त समन्वय बैठक संपन्न

Fri Sep 6 , 2024
नागपूर :-“ईद-ए-मिलाद २०२४” निमीत्ताने दिनांक ०५.०९.२०२४ से ११.३० वा. चे सुमारास, पोलीस आयुक्तालय, पोलीस भवन येथील ऑडीटोरियम हॉलमध्ये रविंद्रकुमार सिंघल, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे अध्यक्षतेखाली  अश्वती दोर्जे सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, अपर पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे प्रमुख उपस्थितीत शरीतुल नयी कमीटी सोबत समन्वय बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. पोलीस आयुक्त यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com