सावनेर व्यापारी संघाची नवी कार्यकारिणी गठीत..

 

सावनेर – 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी झालेल्या सावनेर व्यापारी संघाच्या बैठकीत सर्वसहमतीने नवी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद व्यापारी संघाचे निवृत्त अध्यक्ष विनोद जैन यांनी भूषवले, आणि सचिव मनोज बसवा यांनी आयोजन केले. बैठकीत नवी कार्यकारिणीच्या 14 सदस्यांची घोषणा करण्यात आली.

नवी कार्यकारिणीमध्ये अतुल पाटील अध्यक्षपदी,  दिनेश दमाहे सचिवपदी,  राहुल बारई उपाध्यक्षपदी, पवन जामदार कोषाध्यक्षपदी, दिपक भोंगाडे सहसचिवपदी, तर किशोर अंतुरकर सहकोषाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. तसेच इतर सदस्यांमध्ये विजय पुण्यानी, संजय चंदवानी, प्रफुल्ल चंदनखेड़े, गिरीश बनाईत, विजय पांडे, लिलेश घटे, आशिष सोनभद्रे, जाहीद शेख, पियुष झुनझुनवडिया यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत तरुणांना प्राधान्य दिल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठीत मोहम्मद रफींच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

Fri Aug 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील एमटीडीसी सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोहम्मद रफी यांची कन्या यास्मिन व जावई परवेज रफी यांची उपस्थिती मुख्य आकर्षण ठरले. प्रारंभी मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक एमए कादर, गुलाम अली शेख, सुनील वाघमारे, सईद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com