गॅस सिलेंडरचा काळाबाजारी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा तर्फे मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन, दिनांक २६.०८.२०२४ से १७.२० वा. ते १९.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे कळमणा हद्दीत घर नं. १०४४, गल्ली नं. ४. मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर येथे रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी प्रितपालसिंग उर्फ प्रित गुरूचरणसिंग बागल वय २८ वर्ष हा त्याचे ताब्यात अवैधरित्या परघुती वापराचे तसेच व्यवसायीक उपयोगाने सिलेंडरचा साठा करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता सिलेंडर मधील गॅस मशीनच्या सहाय्याने दुसच्या सिलेंडर मध्ये भरून त्याची विकी करता साठवणुक करतांना मिळुन आला. तसेच आरोपी हा लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करतांना समक्ष मिळून आला. आरोपीचे ताब्यातुन वेगवेगळया कंपनीचे घरघूती/व्यवसायीक लहान व मोठे असे एकुण ५९ सिलेंडर, गॅस रिफीलींग करण्याची मशीन, व चार चाकी टाटा एस वाहन क. एम. एच ३२ क्यू ४६९३, असा एकुण ३,११,५००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाणे कळमणा येथे आरोपींविरूध्द कलम २८५ भा.न्या.सं., सहकलम ३, ७ जीवन आवश्यक वस्तु कायदाअन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा), यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, राहुल शिरे, पोउपनि. राहुल रोटे, पोहवा. राजेन्द्र टाकळीकर, नापो, अमोल भक्ते, पोअं, विशाल नागभिडे, सुधिर तिवारी व आशिष पवार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानिशी ठार मारणाऱ्या आरोपींना अटक

Tue Aug 27 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत शताब्दी नगर चौक, तायवाडे हॉस्पीटल जवळ रोडचे बाजुला, सार्वजनीक ठिकाणी झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरून आरोपी १) राजेश रूपराव प्रधान वय ३२ वर्ष २) भिमा रूपराव प्रधान वय ३५ वर्ग दोन्ही रा. गल्ली नं. १८. कौशल्या नगर, बुध्द विहार जवळ, अजनी, नागपूर ३) विक्की भिमराव गंभीर वय ३० वर्ष रा. गल्ली नं. ५. कौशल्या नगर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com