नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत शताब्दी नगर चौक, तायवाडे हॉस्पीटल जवळ रोडचे बाजुला, सार्वजनीक ठिकाणी झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरून आरोपी १) राजेश रूपराव प्रधान वय ३२ वर्ष २) भिमा रूपराव प्रधान वय ३५ वर्ग दोन्ही रा. गल्ली नं. १८. कौशल्या नगर, बुध्द विहार जवळ, अजनी, नागपूर ३) विक्की भिमराव गंभीर वय ३० वर्ष रा. गल्ली नं. ५. कौशल्या नगर, अजनी, नागपूर व त्यांचे ईतर साथिदार यांनी संगणमत करून फिर्यादीचे पती नामे पवन विजय सोनटक्के वय ३२ वर्ष रा. रामटेके नगर, गल्ली नं. २, अजनी, नागपूर यांना तिक्ष्ण व घातक हत्याराने पोटावर, छातीवर, कमरेवर व डोक्यावर वार करून जिवानीशी ठार केले.
याप्रकरणी फिर्यादी माधुरी पवन सोनटक्के वय ३० वर्ष रा. रामटेके नगर, गल्ली नं. २, अजनी, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे मपोउपनि, जांभळे ७३८५४०५५०४ यांनी आरोपींविरुध्द कलम १०३(१), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला व तपास पथकासह शोध घेवुन आरोपी क. १ ते ३ यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.