पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल केले अभिनंदन

– लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती हे अधिक चांगले सुशासन आणि समृद्धीच्या दिशेने उचललेले पाऊल – पंतप्रधान

नवी दिल्‍ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल अभिनंदन केले आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नव्या जिल्ह्यांकडे आता अधिक लक्ष दिले जाईल आणि सेवा व संधी लोकांच्या अधिक निकट पोहोचतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची X वर पोस्ट सामायिक करताना पंतप्रधानांनी लिहिले:

”लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती हे अधिक चांगले सुशासन आणि समृद्धीच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नव्या जिल्ह्यांकडे आता अधिक लक्ष दिले जाईल आणि सेवा व संधी लोकांच्या अधिक निकट पोहोचतील. तिथल्या लोकांचे अभिनंदन.”

Creation of five new districts in Ladakh is a step towards better governance and prosperity. Zanskar, Drass, Sham, Nubra, and Changthang will now receive more focused attention, bringing services and opportunities even closer to the people. Congratulations to the people there. https://t.co/YDEpGZEiGh

— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2024

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी माध्यमांना केले अवगत

Tue Aug 27 , 2024
मुंबई :- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी मुंबईतील माध्यमांशी संवाद साधला आणि (दूरदृश्य प्रणालीद्वारे) मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील माध्यमांना 26.8.2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेची (युपीएस) प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 24.8.2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना 01.04.2025 पासून लागू होईल आणि 23 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com