अंशत: रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन

– मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना 

मुंबई :- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत दि. ०९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्हयातील ९२९४ इतके Disapproved म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करुन Online Resubmit करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी  तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज Resubmit करावे, जेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे सोईचे होईल.  कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन मुंबई शहर जिल्हयातील सर्व संबंधीतांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व १. महिला २. समुह संसाधन व्यक्ती ३. बचत गट अध्यक्ष ४. बचतगट सचिव ५. गृहणी ६. अंगणवाडी सेविका/मदतनीस ७. ग्रामसेवक ८. वॉर्ड अधिकारी ९. सेतु १०. बालवाडी सेविका ११. आशा सेविका १२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) १३. CMM2 १४. मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापुर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Aprroved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुध्दा पाहता येतील.

सर्व संबंधीतांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघुन त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी. असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इस्कॉनच्या अन्नामृतद्वारे सिम्स हॉस्पिटलच्‍या प्रांगणात भोजन वितरणाला प्रारंभ 

Thu Aug 22 , 2024
नागपूर :-आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए. सी. भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे प्रिय शिष्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात अन्नामृत फाउंडेशन नागपूरद्वारे सिम्स हॉस्पिटल, बजाज नगर प्रांगणात जनरल वॉर्डच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नियमितपणे भोजन वितरण कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला. रामानुज नगर, कळमना मार्केट, भरतवाडा रोड येथे निर्मित श्रीमती स्वर्णलता आणि श्री गोविंद दासजी सराफ (तुमसरवाले) सेंट्रलाइज्ड किचनमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com