नागपूर :- विदर्भातील पौराणिक अष्टविनायका पैकी नागपूरचे आराध्य दैवत असलेली श्री गणेश मंदिर टेकडी स्टेशन रोड सीताबर्डी नागपूर येथे मंदिराचे जीर्णोद्वारांचे काम पूर्ण झाल्याबद्दल 16 आगस्ट रोजी वास्तूपूजन वेदमूर्ती पंडित विश्वनाथ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ॲड. मधुरा सुमित जोशी अड. सुमित गणपतराव जोशी यांच्या हस्ते वास्तुपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी 17 ऑगष्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वास्तुपूजनाच्या वेळी अनेक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. संस्थेचे अध्यक्ष विकास लिमये, माधव कोहळे, श्रीराम कुलकर्णी, अरुण व्यास, दिलीप शाहाकार, अरुण कुलकर्णी, एस एस शर्मा, के सी गांधी, सजंय जोगळेकर, हरी भालेराव, सभासद प्रल्हाद पराते उपस्थित होते. तसेच स्वयंसेवक प्रकाश जाधव, राजेश भालेराव व इतर भक्तगणांनी यावेळी कार्यक्रमात सहकार्य केले. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्रीराम कुलकर्णी गणेश मंदिर टेकडीचे सचिव यांनी कळविले आहे.