नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती देशभर सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. या औचित्याने आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना सद्भावना दिवसाची शपथ दिली.
उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसिलदार आर.के.दिघोडे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते.