कमला नेहरू महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न

नागपूर :- कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य झेंडा वंदनाचा कार्यक्रम अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजित वंजारी आणि संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिता वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम पथसंचलन सादर करून देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.

संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी यांनी स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा तसेच बलिदानाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबून स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करून देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता सर्व आयुष्य अर्पण केले, असे संस्थेचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. अॅड. अभिजित वंजारी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रा. डॉ. स्मिता वंजारी यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपला सर्वागीण विकास करावा, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी तसेच संस्थेचे सचिव तथा आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळक जयंती निमित्य महाविद्यालयात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन अशा विविध स्पर्धेत भाग घेऊन महाविद्यालयाचा गौरव वाढविणाऱ्या यशस्वी तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनी प्रास्ताविक करून नवीन शैक्षणिक धोरणाचा व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत महाविद्यालयाच्या चौफेर यशाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. निनाद काशिकर यांनी केले तर आभार मेघा राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोलीच्या दुर्गम भागापर्यत शासकीय योजनेचा लाभ पोहचला ही शासन व प्रशासन मनापासून काम करत असल्याची फलश्रुती मुख्यमंत्र्यांनी साधला गडचिरोलीत संवाद

Fri Aug 16 , 2024
गडचिरोली :- गडचिरोलीच्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ पोहचला. शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन मनापासून काम करत असल्याची ही फलश्रुती असून याचा मला आनंद आहे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक आणि अभिनंदन केले. शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ व ‘मुख्यमंत्री युवा कार्य योजने’च्या लाभार्थींशी मुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com