महिला लोकशाही दिन 20 ऑगस्ट रोजी

यवतमाळ :- महिलांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या तिसऱ्या सोमवारी सुट्टी असल्याने या महिन्याचा महिला लोकशाही दिन मंगळवारी दि.20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार सादर करावे.

न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विषमुक्त रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे आवश्यक - पालकमंत्री संजय राठोड

Fri Aug 16 , 2024
Ø पालकमंत्र्यांच्याहस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन Ø महोत्सवात दुर्मिळ 38 रानभाज्यांचा समावेश यवतमाळ :- अलिकडे फास्टफुडचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. शरीरास घातक अशा खाद्यपदार्थांचा वापर टाळत नागरिकांनी विषमुक्त अशा रानभाज्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय व जीवनोन्नती अभियानाच्यावतीने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com