अन्यायाच्या विरोधात जागृतीचे कार्य कवींनी करावे – ॲड. नंदा पराते  

नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थाच्या रौप्य महोत्सव निमित्ताने नागपूरातील हिंदी मोरभवन, झाशी राणी चौक येथे कवी संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा, क्रांतिसूर्य सावित्रीबाई जोतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या छायाचित्रास मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी माल्यपर्ण करून अभिवादन केले.

या कवी संम्मेलनाचे उद्घाटन आदिम नेत्या व प्रदेश कॅाग्रेस सरचिटणीस ॲड. नंदा पराते यांनी केले. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष ॲड. प्रकाश दुलेवाले तर अतिथी ॲड. माधुरी वसंत शोभा या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी हलबा समाज विकास संस्थेचे सचिव भास्कर चिच़घरे यांनी केले. या कवी संमेलनात डॉ. विजय सोरते ,नाना शेंडे,प्रकाश पाठराबे,नागोराव सोनकुसरे ,इशांत चिचघरे,मीना पौनीकर,वर्षा ढोके मंजुषा वाहणे ,प्रझ्या बाली,रुपाली निखारे,हृदय चक्रधर ,देवेंद्र बोकडे,भीमराव भिमटे,रिषिता निमजे,हेमलता ढवळे या कवींनी सहभाग घेतला.

या कवी संम्मेलनाचे उद्घाटन करतांना आदिम नेत्या ॲड. नंदा पराते म्हणाल्या की कवी यांनी अन्यायाच्या विरोधात समाजात जागृतीचे कार्य त्यांच्या कवितांच्या माध्यमातून केल्यास जन सामान्य नागरिकांना अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. या देशातील शेतकरी, महिला, बेरोजगार युवक यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कवींनी कविता केली पाहीजे. भारतीय संविधानाचे मूल्य राखण्यासाठी व देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कवी मंडळींनी सतत कार्य करावे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रूपचंदजी मौदेंकर, शैलेश कुहिकर, उमाकांत बारापात्रे, रविंद्र फनिभरे, शंकर बावने,मनोहर वाकोडीकर,विजय डोबारकर, भरतं पेकडे, लक्ष्मण बावने,राजेश खापरे ,सुदाम हेडाऊ यांनी अथक परिश्रम घेतले.

कवी संम्मेलनाचे सूत्रसंचालन भारती मांढळकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत माताघरे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोटनिवणुकीत महाविकास आघाडीच्या राखी परते विजयी

Mon Aug 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मत मोजणीत महाविकास आघाडी व्दारे कॉग्रेस च्या राखी परते ८३४ मते घेऊन विजयी झाल्याचे निवडणुक अधिकारी वंदना संर्वगपते, नगरपरिषद मुख्या धिकारी रविंद्र श्रीराम राऊत हयानी घोषित करताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला. नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com