शेलोडी, भांडेगाव येथील ५२ लाभार्थ्यांना कायमस्वरूपी जमीनीचे पट्टे

– पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वितरण

दारव्हा :- तालुक्यातील भांडेगाव, शेलोडी येथील अनेक कुटुंबांच्या संघर्षाला पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांमुळे यश आले आणि जवळपास ५२ कुटुंबांना हक्काची जमीन मिळाली. शेलोडी येथील ३७ तर भांडेगाव येथील १५ लाभार्थ्यांना हक्काची जागा त्यांच्या नावे करून देण्यात आली. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सर्व लाभार्थ्यांना दारव्हा येथे या जमिनीच्या लीजपट्ट्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

शेलोडी व भांडेगाव येथील हे लाभार्थी अनेक वर्षांपासून जमिनीचे लीजपट्टे मिळावे म्हणून मागणी करत होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी या संदर्भात महसूल विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून शासन नियमाप्रमाणे शेलोडी येथील ३७ व भांडेगाव येथील १५ लाभार्थ्यांना नमूना आठ अ मध्ये ५०० चौरस फुट इतकी जागा त्यांच्या नावावर करून देण्यात आली. लाभार्थ्यांना आता या जागेवर हक्कोच घर बांधता येणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते, दारव्हा येथील उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार काळे आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांना लीजपट्टा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांचे आभार मानून त्यांच्या प्रयत्नांमुळे हक्काची जागा मिळून घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी शेलोडी, भांडेगाव येथील नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पराभवाच्या भीतीपोटी 'लाडकी बहीण’ योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

Mon Aug 12 , 2024
– महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना 25 लाख राख्या पाठविणार मुंबई :- महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com