सोमवारी कलेक्टर कार्यालयावर आक्रमण युवक संघटने तर्फे अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या नागरिकांचा मोर्चा

नागपूर :- शहरात शनिवारी पहाटेपासून तर दहा ते अकरा वाजेपर्यंत सतत मुसळधार पावसाने थैमान घातले. दमदार पावसामुळे इमामवाडा, रामबाग, शांती नगर, जततरोडी, इंदिरानगर, मिनिमाता नगर, तकीया, वैशाली नगर, पंचशील नगर, जरीपटका, कळमना, पिवळी नदी, धम्म नगर, कुंभार टोळी या संपुर्ण भागात मुसळधार पावसाने सर्वात जास्त नुकसान केले. गोरगरीब, कामगार दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इमामवाडा येथिल रवी मूर्ती कारखान्याच्या मागचा संपूर्ण भाग नाल्याच्या पाण्यामुळे घरामध्ये पाणी शिरले. दलित वाचनालय, बुद्ध विहाराच्या पाठीमागचा भाग, पाच नल चौक, रामबाग, अशोका बुद्ध विहार इमामवाडा या संपूर्ण क्षेत्रामध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याची नुकसान झाले आहे.महत्त्वाचे कागदपत्रे, मुलांचे शाळेतील पाठ्यपुस्तके पाण्याने ओले झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे.विशेष म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा ढग फुटी पाऊस पडल्यामुळे शासनाने कुठलीही मदत पुरवली नाही किंवा कुठलाही सर्वे बरोबर न झाल्यामुळे तूट पणजी आर्थिक मदत देऊन शासनाने आपले कर्तव्य निभवले होते. परंतु आजच्या पावसाने ज्या घरात मागच्या वर्षी पाणी शिरले होते त्याच घरात पुन्हा एकदा पावसाचे पाणी शिरल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांची हानी झाली आहे.

सर्वे हा फक्त कागदावर दाखवण्याकरिता असतो परंतु मुळात ज्यांच्यावर अन्याय झालेले आहे ज्यांच्या घरी पाणी गेलेले आहेत त्यांना मुळीच पैसे मिळत नाही हे शासनाचे कुचकामी काम आहे. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रातले आमदार देवेंद्रजी फडणवीस दक्षिण पश्चिम विधानसभा मधून गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहे परंतु एकही वेळा या क्षेत्रामध्ये ते आलेले नाही किंवा भटकले सुद्धा नाही. नुसते राज्यात लक्ष देण्यापेक्षा आपल्याही क्षेत्रात लक्ष दिले असते तर इतकी मोठी हानी आज जनतेला सहन करावी लागली नसती. त्याच बरोबर गणेश पेठ, धम्मनागर, शांती नगर, कडमना, वैशाली नगर, जरीपटका, या संपुर्ण भागात लोकांचा घरात अचानक पाणी घरामध्ये शिरले मुडे मोठी हानी झाली आहे.

नागपूरचे खासदार मा.नितिन गडकरी तसेच राज्याचे उपमुखयमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर सर्वे करुन विशेष अर्थिक पॅकेज जाहीर करावे. अन्यथा आक्रमण युवक संघटना रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणार असा इशारा दिला. म्हणूनच सोमवारी हजारो पीडित नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हा कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या सर्वांना निवेदन देण्यात येणार आहे. प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आक्रमनचे जिल्हा अध्यक्ष ओपुल तामगाडगे यांनी माहिती दिली. आक्रमण युवक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण नागपूर मध्ये होणाऱ्या अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाई करिता व गरिबांना आर्थिक मदत देण्याकरिता कलेक्टर साहेबांना व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. त्याकरिता सोमवारी दुपारी 12 वाजता. संपूर्ण नागरिक व आक्रमक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कही सपना बनकर न रह जाएं छोटे शहरों को जोड़ने वाली "ब्रॉडगेज मेट्रो"

Sun Jul 21 , 2024
– २०१४ में केंद्रीय मंत्री गडकरी को दी थी विस्तृत जानकारी,10 वर्ष बाद भी ब्रॉडगेज मेट्रो पटरी पर नहीं  नागपुर :- नागपुर शहर में मेट्रो ट्रेन चलाने के साथ ही अब नागपुर से बूटीबोरी, रामटेक, वर्धा, कामठी, कन्हान, कलमेश्‍वर, काटोल, छिंदवाड़ा, चंद्रपुर, अमरावती, नरखेड व भंडारा, गोंदिया शहर तक ‘ब्रॉडगेज मेट्रो रेल’ सेवा शुरू करने का प्रस्ताव अब भी पटरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com