नागपूर :- पोस्टे कुही येथील स्टाफ पोस्टे कुही परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मांढळ बस स्टॉपच्या मागे झाडाखाली एक इसम सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेवुन त्यांना कागदी चिठ्ठयावर सट्टापट्टी, वरळी मटका जुगाराचे आकडे लिहुन जुगाराचा खेळ खेळवत आहे. अशा माहिती वरून कुही येथील मांढळ बस स्टॉपच्या मागे झाडाखाली सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे- लक्ष्मण बिशन दुधपचारे वय ४९ वर्ष रा. वार्ड क. ३, मांढळ ता. कुही हा सट्टापट्टी, वरली मटका जुगाराचे आकडे लिहताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता एक बॉल पेन किमंती ०५/०० रूपये व नगदी ७४५/- रूपये असा एकुण ७५०/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे कुही कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोस्टे सावनेर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलौंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा पाटणसावंगी येथे आरोपी नामे सुनील माणिकराव मडावी वय ४५ वर्ष यह. वार्ड नं १ पाटणसावंगी ता. सावनेर जि नागपूर हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून सट्टापट्टीचे वेगवेगळे जुगाराचे आकडे व पैसे मेऊन ते जुगाराचे आकडे कागदावर लिहून देऊन वरली मटक्याचा हारजीतचा जुगार खेळवताना मिळून आल्याने त्याचेकडून १) नगदी ४८०/- रू. २) एक निळया शाईचा बॉलपेन की. ०५/- रू. ३) एक सट्टापट्टीचे वेगवेगळे आकडे लिहिलेला कागद ४) एक निळ्या रंगाचा कार्बन को. ०५/- रू. एकुन ४९०/- रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम १२ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.