– नवी दिल्ली येथे १८ जुलैला होणार सन्मान : मनपा आयुक्तांनी केले चमूचे अभिनंदन
नागपूर :- भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनालिटिकल रिअल टाइम रँकिंग’ (SPARK-2023-24) पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मनपाच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान चमूचे अभिनंदन केले आहे.
१८ जुलै रोजी नवी दिल्ली मधील स्टीन ऑडिटोरियम, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे ‘उत्कृष्टता की और बढते कदम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेच्या गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मनपातील अधिकारी सोबत तीन सदस्यीय चमू दिल्ली येथे जाणार आहे, अशी माहिती समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेला दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनॅलिटिकल रिअल टाइम रँकिंग’ (SPARK-2023-24) पुरस्कार विजेत्यांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मिशनची यशस्वी अंमलबजावणी करण्यात अमूल्य भागीदारीबद्दल मंत्रालयातर्फे देखील मनपाचे अभिनंदन करण्यात आले आहे.