महावितरणची राज्य नाट्य स्पर्धा आजपासून

नागपूर :- महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा दि. 12 व 13 जुलै 2024 रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे होत आहे. या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत महावितरणच्या पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोकण आणि नागपूर येथील प्रादेशिक विभागातर्फ़े नाटक सादरीकरण होणार आहे.

या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र (भाप्रसे) यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी आणि संचालक (वित्त) अनुदिप दिघे प्रमुख पाहुणे म्हणून तर छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता (भाप्रसे), कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री रिचर्ड यांथन (भाप्रसे), आणि पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे प्रामुख्याने उपस्थित राहतील

या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सकाळी 10 वाजता पुणे प्रादेशिक संघातर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘ती फ़ुलराणी’, तर दुपारी 2.30 वाजता छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक संघातर्फ़े डॉ. गणेश शिंदे लिखित ‘उत्तरदायित्व’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता कोकण प्रादेशिक संघातर्फ़े सुरेश जयराम लिखित ‘डबल गेम”’ तर नाहपूर प्रादेशिक संघातर्फ़े दुपारी 2.30 वाजता प्रकाश दाणी लिखित ‘नथिंग टु से’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी दि. 13 जुलै रोजी सांयकाळी 5.30 महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (भाप्रसे) यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी आणि संचालक (वित्त) अनुदिप दिघे प्रमुख पाहुणे म्हणून तर छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता (भाप्रसे), कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक रिचर्ड यांथन (भाप्रसे), आणि पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक  अंकुश नाळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

या नि:शुल्क दर्जेदार नाट्यकृतींचा नाट्यरसिकांनी आस्वाद घेत या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन नाट्यस्पर्धा आयोजन समितीचे मुख्य समन्व्यक आणि महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि आयोजन समितीचे निमंत्रक अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, गोंदीया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिष गजबे आणि नाट्यस्पर्धा आयोजन समितीतर्फ़े केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

५०० किलो प्लास्टिक जप्त 

Fri Jul 12 , 2024
– ५६ हजार रुपयांचा दंड – मनपा उपद्रव शोध पथकाची कारवाई  चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सराई मार्केट जवळील आरको गोडाऊन येथे धाड टाकुन केलेल्या कारवाईत ५०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असुन ५६ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रतिबंधित स्वरूपाचा मोठा प्लास्टिक साठा आढळल्याने दंड वसुल करण्यात आला असुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com