विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाकरिता राज्य शासनाद्वारे जावक अटी रद्द करा – दुनेश्वर पेठे

नागपूर :- राज्यातील सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाद्वारे राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना अंतर्गत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण परदेशामध्ये घेण्याकरिता शासनाने असंवैधनिक उत्पनाची, शैक्षणिक टक्केवारीची, तसेच सीमित शिष्यवृत्तीची, जाचक अट लावून विद्यार्थ्यांची गठचेपी केलेली आहे. यामध्ये ५५% टक्के ऐवजी ७५% टक्के ची अट, ८ लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू करून कीमीलेअरची संकल्पना इत्यादी सुधारित शासन आदेश काढून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे.

तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये तत्कालीन मंत्रिमंडळानी कोणत्याही प्रकारचे जाचक अटी लावून विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये आडकाठी करण्यात आलेली नव्हती परंतु दिनांक ३१ मार्च २०१६ चे शासन आदेशामध्ये मुद्दा क्रमांक १८ व मुद्दा क्रमांक १९ मध्ये उच्चतंत्र शिक्षण विभागाने खाजगी महाविद्यालयात प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या थेट संबंध संस्थांचे मूल्यांकन व दर्जा नामांकनांशी जोडून लाभार्थी अनुसूचित जातीचे प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षण शिल्लक शुल्क न्याकच्या अटीवर डावलण्यात असे जाचक अटी लावून ३१ मार्च २०१६ चे परिपत्रक महारष्ट्र राज्यमध्ये लागू करण्यात आले. त्यामुळे शिक्षण शुल्कांच्या अभावी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्रदंड सोसावा लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे नागपुरी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वामध्ये प्रतिनिधी मंडळांने तीव्र निषेध व्यक्त करून नागपूर विभागीय उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन जाचक अटी रद्द करून परदेशी शिष्यवृत्ती व दिनांक ३१ मार्च २०१६ मधील मुद्दा क्रमांक १८ व मुद्दा क्रमांक १९ रद्दबातल ठरवून शिक्षण शुल्क विद्यार्थ्यांना पूर्वलक्षीप्रभावाने सुध्छिपत्रक कडण्यात यावे असे न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी विद्यार्थांना न्याय मिळवुन देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आंदोलनात्मक प्रक्रिया घेण्यास तत्पर राहील.

यावेळी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे, देवेंद्र घरडे, शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, राजा बेग, अशोक काटले, अश्विन जवेरी, सुनील लांजेवार, आशुतोष बेलेकर, शेखर पाटील, संजय आग्रे, लीना पाटील, नसीम सिद्दिकी, सोनाली भोयर, चंद्रकांता जयस्वाल, यशश्री बनसोड, विश्वजीत सावडीया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्तांच्या हस्ते आपली बसच्या ऑनलाईन तिकीटींग योजनेचे लोकापर्ण

Tue Jul 9 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवारी(ता: ८) नागपूर शहरातील जनतेच्या/विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता ऑनलाईन पासेस, ऑनलाईनबस ट्रॅकिंग, ऑनलाईन शहर बस तिकीटींग व यु.पी.आय. द्वारे शहर बस तिकीट घेण्याच्या योजनेचे लोकापर्ण करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल प्रामुख्याने उपस्थित होत्या. असा घ्या लाभ सदर सेवेचा लाभ घेण्यास्तव लाभार्थ्यांकडे अॅन्ड्रॉईड/आय.ओ.एस. मोबाईल असणे गरजेचे आहे. नागरीकांनी आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com