कळंब :- स्थानिक इंदिरा महाविद्यालयात वृक्षारोपण पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वृक्षारोपण पंधरवाडा निमित्त महाविद्यालय परिसरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये कडुनिंब,पिंपळ, सिताफळ, वड, करंजी, आंबा, शीशम इत्यादी प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण पंधरवाडा कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एम. चव्हाण व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ सरयु बोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षारोपण पंधरवाडा कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. मांडवकर यांनी पुढाकार घेऊन विशेष मार्गदर्शन केले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील उपप्राचार्य एस. वाय. लखदिवे डॉ.एम.पी. राखुंडे, प्रा. पी. एस. जमादे,डॉ. व्ही. पी. मांडवकर, एन.व्ही. नरुले, डॉ. पी. आर. बोंडे, डॉ. सूरज देशमुख, डॉ के आर नेमाडे डॉ पी. बी. इंगळे डॉ. व्ही. आर. पत्की प्रा.बोदुलवार,प्रा. वाटकर,प्रा. आत्राम, प्रा. सांगळे बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.