– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
नागपूर :- नागपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे यांनी कंत्राटदारांना कायम न करता पेमेंट केला असा आरोप महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहराध्यक्ष सिद्धेश्वर कोमजवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेला आहे. सावली असोला मेंढा नवीनकरण विभाग क्रमांक 2 च्या भागातील कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे होते. त्यांच्या कार्यकाळात हा महाघोटाळा आहे. सोनोने हे चंद्रपूर पाटबंधारे विभागात असताना सुद्धा त्यांनी असाच घोटाळा केला होता.त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे तक्रार करण्यात आलेली आहे.
राजेश सोनवणे यांनी आसोला मेंढा विभाग सावली येथील 6 हेक्टर शेतीला पाणी न देता पाणी दिल्याचा गवगवा केलेला होता. हे विशेष: या प्रकरणात सोनोने यांच्यावर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता (गोसीखुर्द प्रकल्प) यांनी आरोप पत्र दाखल केले आहे भ्रष्ट कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष सिद्धेश्वर कोमजवार यांनी प्रसिद्धी पत्रकात केलेले आहे.