![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नवी मुंबई :- भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, २६ जून, २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी कोकण विभागातील पालघर जिल्हयाकरीता 02525 – 250808, ठाणे 022 -25342125, रायगड 02141-224131, रत्नागिरी 02352-226248 आणि सिंधुदुर्ग 02362-228824 हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या हेल्पलाइनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे निवडणूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.
सोमवार १ जुलै, २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४. नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे पार पडणार आहे.