नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.21) ओमकार नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.
या अभियानाला ओमकार नगर चौक परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.
याप्रसंगी ग्रीन व्हिजीलचे सर्वश्री कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, श्रेया जोग, प्रिया यादव, पार्थ जुमडे, मनपाचे प्रकाश रुद्रकर, अजय वानखेडे, अमोल कोहले यांच्यासह भोलानाथ सहारे, सुरेश रेवतकर आदींची उपस्थिती होती.