खापरखेडा :-नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीचे घटना वाढलेली असल्याने पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार नागपुर ग्रामीण यांनी सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी व सर्व ठाणेदार यांना मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास निर्देश दिले असता उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान संतोष गायकवाड व ठाणेदार खापखेडा धनाजी जळक यांनी पथक तयार करून तपास चक्र फिरवुन मोटार सायकल चोरांबाबत गोपनिय माहीती काढुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी १) कैलास हरिचंद्र तांडेकर वय ३२ वर्ष, २) आकाश हरिचंद्र तांडेकर वय ३० वर्ष दोन्ही रा. बिना संगम यांना चिखलीकला, पोलीस चौकी उमरानाला, जिल्हा छिंदवाडा (म.प्र) येथुन दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्याचा पीसीआर घेऊन छिंदवाडा, बैतुल येथुन ७ मोटार सायकली जप्त करून खापरखेडा व लगतचे पोलीस स्टेशन परिसरातील मोटर सायकल जप्त करून गुन्हे उघडकीस करण्यात आली. त्यामध्ये पोलीस स्टेशन खापरखेडा गुन्हयातील ३ मोटार सायकल व पोलीस स्टेशन कोराडी नागपुर शहर गुन्हयातील ३ मोटर सायकल व एका मोटार सायकल मालकचा शोध सुरू आहे. पो.स्टे. खापरखेडा येथील डी बी. पथकांना मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यास व ७ मोटर सायकली हस्तगत करण्यास यश प्राप्त झाले. पाहीजे आरोपी विक्की तुरकाम रा. कोराडी हा फरार असुन त्यांचा शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान डॉ. संतोष गायकवाड , ठाणेदार धनाजी जळक, पोउपनि आरती नरोटे, डी. वी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, कविता गोंडाने, मुकेश वाघाडे, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.