उमरेड :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन उमरेड येथे अप. क्र. ५८३/२०१८ कलम ३७६ (१) ३७६ (२) (जे) (आय) (एम) भादवि, ३०७ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील जखमी पिडीता ही गोकुल कोळसा खदान उमरेड येथे मागील दोन वर्षापासुन कामावर होती. दि. १४/०८/२०१८ चे १३/३० ते १४/३० वा. दरम्यान जखमी पिडीता ही महिलांसाठी तात्पुरता तयार करण्यात आलेला बाथरूम मध्ये बाथरूमसाठी गेली असता आरोपी नामे मामलेश कन्हैयालाल चक्रवर्ती, वय २० वर्ष रा. जयसिंग नगर देवास इंदौर (म.प्र.) हा तिचे मागोमाग बाथरूम मध्ये जावुन तिचेवर जबरीने बलात्कार केला. जखमी पिडीताने विरोध केला असता आरोपीने बाजुचा दगड घेवुन जखमीच्या डोक्यावर आणि चेह-यावर दगडाने जिवे ठार मारण्याचे उददेशाने मारून पिडीतेला गंभीर जखमी केल्याने आरोपीविरूदध कलम ३७६(१), ३७६ (२) (जे) (आय) (एम) भादवि ३०७ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकरणाचे तपास पौर्णिमा तावरे यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डि. जे. ०६, श्री. जी. पी. देशमुख साो. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक ०५/०६/२०२४ रोजी मा. डि. जे. ०६, जी. पी. देशमुख साो. यांनी वरील नमुद आरोपीला भादंवि कलम ३०७ अंतर्गत आजन्म कारावास व ५,००० रू द्रव्यदंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास. भादवि कलम ३७६(१), ३७६ (२) (जे) (आय) (एम) भादवि मध्ये आजन्म कारावास, व ५००० रूपये द्रव्यदंड, दंड न भरल्यास ०१ महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी रश्मी खापर्डे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन सफौ वनिता सावरकर पोस्टे उमरेड यांनी मदत केली आहे.