“नागपुरातील पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण” कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थिती “नागरी स्थानिक नियोजनासाठी नागपुरातील पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण” या विषयावर मंगळवार (ता.१४) रोजी कार्यशाळेचे (Geospatial Analysis of Flood Risk and Heat Wave in Nagpur City for Urban Local Planning) आयोजन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात नागपूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात उत्पन्न होणारी पूर परिस्थिती तसेच उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यशाळेत यूएनडीपी च्या मार्गदर्शनाखाली अल्यूव्हियम इंटरनॅशनल व अल्यूव्हियम कंस्लटेंसी इंडिया यांच्याद्वारे संगणकीय सादरीकरण करीत चर्चासत्र घेण्यात आले.

याप्रसंगी यूएनडीपी च्या शहर समन्वयक आरुषा आनंद, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर, मनपाचे नगररचनाकार ऋतुराज जाधव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रातिनिधी अंकुश गावंडे, प्रमोद कडे, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता पी.डी. अंभोरकर, धमेंद्र चुटे,  संजय चिमूरकर, मनपाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदाडे, उप अभियंता आनंद मोखाडे, शिक्षण विभागाचे मनोज लोखंडे,  राजेश बोरकर, श्वेता दांडेकर, आर. एन. जीवतोडे, उद्यान विभागाचे रोशन वाघमारे, संजय बिसने यांच्यासह अल्यूव्हियमचे पार्थ गोयल, आकाश मलिक, तरीया गुलाटी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेला मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम नागपूर शहरातील नाग नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी व नदीस पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध कारण तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान यावर करण्यात आलेल्या विश्लेषण अध्ययनाची माहिती जाणून घेतली. तसेच नागपुरातील पुराचा धोका कमी करण्यासाठी आवशक ती माहिती संबंधित विभागाने द्यावी अशा सूचना देखील दिल्या. तर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी तापमानासह हिट इंडेक्स दोन्हीचे विश्लेषणात्मक माहितीच्या आधारे पुढील धोरण आखावे अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.

कार्यशाळेच्या प्रारंभी यूएनडीपी च्या शहर समन्वयक आरुषा आनंद यांनी कार्यशाळे विषयी माहिती दिली, महाराष्ट्रासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासन व जीओएम-यूएनडीपी कार्यक्रमांतर्गत शहरी घटकामधील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मॉडलिंग उपक्रम तयार करण्यात येणार आहे. याकरिता नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांसाठी जोखीम मूल्यांकन आणि भू-स्थानिक विश्लेषण” कार्य केले जाणार असल्याचे आरुषा आनंद यांनी सांगितले.

कार्यशाळेत अॅल्यूव्हियमचे पार्थ गोयल आकाश मलिक, तरीया गुलाटी यांनी संगणकीय सादरीकरण करीत नागपूर शहरातील पावसाळ्यात उत्पन्न होणारी परिस्थिती व उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण कार्याच्या पद्धती विषयी माहिती दिली. तसेच विश्लेषणाची माहिती पुस्तिका, नकाशे व सर्व समावेश आपत्ती व्यवस्थापक नियोजन शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नकली कूलर बनाया और 20 लाख का माल बेच दिया

Wed May 15 , 2024
– गोरखधंधे के बारे में पता चला तो उसने जवाब मांगने पर मालिक को ही जान से मारने की धमकी दे डाली नागपुर :- कूलर कंपनी में एक मैनेजर ने मालिक को चूना लगाकर नकली कूलर बनाया और 20 लाख का माल बेच दिया. जब उसे कंपनी का नाम लेकर नकली कूलर बेचने के गोरखधंधे के बारे में पता चला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com