संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. यादवरावजी भोयर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २ मे २०२४ ला सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या कामठी येथील शैक्षणिक परिसरातील स्व. यादवरावजी भोयर मेमोरियल हॉल येथे अभिवादन करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, सचिव सुरेश भोयर तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, अनुराग भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थेंतर्गत सर्व महाविद्यालय व शाळेचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्व. यादवरावजी भोयर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी भोयर यांनी केलेल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या बहुमूल्य कार्याची आठवण करून आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मुकेश घोळसे, बीएड काॅलेजच्या प्राचार्या डॉ रूपाली पाटील, पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ ईशा मुदलियार, गादा फार्मसी कॉलेज चे प्राचार्य र्डॉ अतुल हेमके तसेच कामठी फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ दिनेश बियानी, प्राध्यापक राध्येशाम लोहिया यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करुन भोयर साहेबांना अभिवादन केले.
कार्यक्रमाला संस्थेतंर्गत महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ प्राध्यापक गण, शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मधुरा दिक्षित यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने करण्यात आला.