नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत ह.मु सिमॉसिस कॉलेज येथे राहणारे फिर्यादी सौरभकुमार किष्णकुमार शर्मा वय २८ वर्ष रा. वैसाखी सरनी, पश्चिम बंगाल, हे त्यांचे रूमवर असतांना, त्याचे मोबाईलवर वर व्हॉट्सअॅप द्वारे आरोपी अनोळखी आरोपीने क्रिप्टो करंसी याबाबत तसेच पार्टटाईम नोकरी बावत माहिती सांगुन, फिर्यादीस विश्वासात घेतले फिर्यादीने त्यास गुंतवणूक करायची आहे असे सांगीतलेवरून आरोपीने फिर्यादीस क्रिप्टो करंसीमध्ये ट्रेडींग करण्यात येत आहे. असे खोटे भासवुन, फिर्यादीस वेळोवेळी पैसे गुंतविण्यास सांगीतले. फिर्यादीने वेळोवेळी एकुण २३,०४,२१७/- रू. ची गुंतवणुक केली. आरोपीने फिर्यादीस कोणताही फायदा न देता व फिर्यादीने गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता फिर्यादीचा विश्वासघात करून फिर्यादीची २३,०४,२१७/- रू. ची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्जाचे चौकशीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि लेहपांडे यांनी आरोपीविरूद्ध कलम ४१९, ४२० भा.दं.वि., सहकलम ६६(सि), ६६ (डी) आयटी. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.