संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर परिसर रहिवासी घराचे विद्दूत बिल भरण्यावरून पती पत्नीत झालेला कौटुंबिक वाद हा विकोपाला जाऊन भांडण मारझोडीत रूपांतर झाले.यामध्ये संतापलेल्या पतीने अश्लील शिवीगाळ देऊन स्वयंपाक खोलीतील गंज पत्नीच्या डोक्यावर मारल्याने पत्नी रक्तबंबाळ झाली.यासंदर्भात फिर्यादी जख्मि पत्नी दीपमाला कांबळे वय 34 वर्ष रा कामगार नगर कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती राविकुमार तरुण कांबळे वय 38 वर्षे रा कामगार नगर,कामठी विरुद्ध भादवी कलम 324,504 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.