नागपूर :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ही शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच आगामी सन उत्सव छत्रपती शिवजयंती (तिथीनुसार), होळी, धुलिवंदन, गुड फ्रायडे, इस्टर संडे हे सन शांततेत पार पडावे या करिता पोलीस स्टेशन जलालखेडा स्तरावरून रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते दरम्यान पोलीस स्टेशन जलालखेडा अंतर्गत काल दिनांक १९/०३/२०२४ रोजीचे १६/३० ते २०/०० वा. पर्यंत जलालखेडा टाऊन, लोहारी सावंगा, भिष्णूर येथे रूटमार्च घेण्यात आला. रूट मार्च दरम्यान सपोनी सी. बी. चौहान, ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विपीन रामटेके साहेब, तसेच अंमलदार १० व १६ होम सैनिक, रेल्वे पोलीस फोर्सचे ०१ अधिकारी २० कर्मचारी असे एकूण ०३ अधिकारी, ३० पोलिस अंमलदार व १६ होम सैनिक रूट मार्च करिता हजर होते.
सदरची रूटमार्च कार्यवाही हर्ष. ए. पोद्दार (पोलीस अधिक्षक (नागपूर ग्रा), अपर पोलीस अधिक्षक उपविभागीय पोलीस अधि. सा. (काटोल वि. काटोल) यांचे मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि/सी.बी. चौहान व त्यांच्या पथकाने केली.