बँकांच्या मदतीने सामान्य माणसाला आर्थिक समावेशनामध्ये आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिजाऊ कमर्शियल बँकेच्या शाखेचा स्थानांतरण सोहळा     

नागपूर :- जनतेच्या पैशांचे विश्वस्त म्हणून बँका कार्य करीत असतात. यापुढे जावून विविध योजनांच्या माध्यमातून बँकांच्या मदतीने सामान्य माणसाला आर्थिक समावेशनामध्ये आणण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजाऊ कमर्शियल को.ऑप. बँक लि. शाखेचे येथील भामटी परिसरात स्थानांतर झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार विकास ठाकरे, बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष अविनाश कठाळे, संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात बँकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. जिजाऊ कमर्शियल को.ऑप. बँकेनेही आपल्या कार्यक्षेत्रातील खातेदारांना उत्तम सेवेद्वारे देशकार्यात योगदान दिले आहे. या बँकेचा ताळेबंद बघता आरबीआयच्या सर्व मानकावर उत्तम कागगिरी केल्याचे दिसून येते असे सांगत आई जिजाऊचे नाव या संस्थेला असल्याने ही बँक अधिक प्रगती करेल, अशा शुभेच्छाही दिल्या. 

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने यावेळी फडणवीस यांच्या हस्ते बँकेच्या दोन महिला कर्मच्याऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अविनाश कठाळे यांनी प्रास्ताविक केले तर बँकेचे संचालक बबन आवारे यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला सशक्तीकरण अभियानातून 2 कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sat Mar 9 , 2024
▪️ कोल्हापूर जिल्हयासाठी 4 हजार 50 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांची घोषणा ▪️ महिला मेळाव्यात 15 कोटींच्या विकासकामांचे ऑनलाईन लोकार्पणhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कोल्हापूर :- राज्यात ‘माविम’ अंतर्गत 10हजार 500 गावात, 295 शहरात एकुण 1 लाख 65 हजार बचत गटांमार्फत 20 लाख महिला जोडल्या असून राज्य शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2 कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल घडवणारे अभियान ठरले आहे, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com