नागपूर :- म.न.पा. मालमत्ता कर विभाग झोन क्र. 02 तर्फे जयंत मारोतराव धनवटे व इतर वार्ड क्र. 73 म.न.पा. घर क्र. 1758/I/A रा. काचीमेंट, खसरा क्र. 24,26,27, 28, 29/1 अमरावती रोड, नागपूर या मालमत्तेवरील सन 2008 ते सन 2024 पर्यंत 1,08,04,869/- इतकी थकबाकी या मालमत्तेवर आहे. या मालमत्ताधारक यांना वारंवार सुचना व नोटीस दिलेले आहे. तरी सुध्दा यांनी आपल्या मालमत्तेची थकबाकी म.न.पा. कार्यालयात भरणा केलेला नाही. या बाबीनमुळे धरमपेठ झोन कार्यालयाने मालमत्तेवरती महाराष्ट्र महानगरपालिका च्या नियमानुसार जप्तीची कार्यवाही केलेली आहे. जप्ती नंतर थकित मालमत्ता धारकांनी विहित मुदतीत थकित मालमत्ता कराचा भरणा न केल्यास सदर भुखंड जाहिर लिलाव पध्दतीने विक्री करून थकित रक्कम वसूल करण्यात येईल. याची थकबाकीधारकांनी नोंद घ्यावी. अशी सूचना झोनचे श्री. प्रकाश वराडे सहा. आयुक्त, झोन क्र. 02 यांनी केली आहे.
उपरोक्त जप्तीची कार्यवाही प्रकाश वराडे, सहा. आयुक्त, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली या कार्यवाही मध्ये सहा. अधिक्षक, बाहादुरसिंग एस. बरसे, कर निरीक्षक राहुल वासनीक, अशोक खाडे, अनिल महाजन, प्रदिप मांजरे, सुनील चव्हाण, विजय जाधव, विनोद मेश्राम, सुदर्शन वाहाणे, मालीकर, चेतन राठोड, प्रशांत लोखंडे व अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
धरमपेठ झोन तर्फे थकीत मालमत्ता कराचे वसुलीसाठी दररोज वॉरंट कार्यवाही करण्यात येत असून मालमत्ता बकाया धारकांना आव्हान/विनंती करण्यात येते की, म.न.पा.च्या अभय योजना 2023-24 अंतर्गत एकमुस्त पुर्ण रक्कम म.न.पा. निधीत जमा केल्यास शास्ती व दंड रक्कमेवर 80% सुट देय आहे. या योजनेचा लाभ घेण्यात यावा व कृपया सदर मालमत्ता जाहीर लिलाव पध्दतीने होणारी विक्री टाळावी.