नागपूर :-दिनांक ०६/०३/२०२४ वेळ १०.३० वा. ते ११.१५ वा. रोजी सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक प्रमोद मडावी, शिवा नागपुरे, पोलीस अंमलदार क्रांतीचंद हराळ, मनिश चौकसे, विष्णु लहाने केशव फंड असे दारूबंदी बावत पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन विश्वसनिय माहिती मिळाली की, मौजा; चौरबाहुली जंगल परीसरात नाल्यालगत एक इसम मोहाफुल गावठी दारूची हातभट्टी अवैधरित्या काढत आहे. अशा मिळालेल्या खबरेवरून सदर ठिकाणी जावुन रेड केली असता त्या ठिकाणी १) प्रत्येकी ५० लिटर प्रमाणे एकुण ०९ प्लास्टीक ड्रम मध्ये एकुण ४५० लिटर रसायन सडवा किमंती २०/-रू. लिटर प्रमाणे एकुण १०००/- रू २) दोन रबरी टयुब मध्ये ३० लिटर प्रमाणे ६० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती प्रति ५०/- रू प्रमाणे एकुण ३०००/-रु. ३) ०९ लास्टीक इम, ०२ फेटली दारू गाळण्याचे इतर साहीत्य किमंत ६०००/-रू अशा एकुण १८०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपी नामे, राकेश उर्फ गौरव अशोक कोडवते वय २३ वर्ष रा. चौरबाहुली ता. रामटेक जि. नागपुर यांचे विरुध्द पोस्टे ला अप. क्र. ६३/२४ कलम ६५ (ई), एफ, सि मदाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नाना, रमेश धुमाळ, अपर पोलीस अधिक्षक नाग्रा, व रमेश बरकते, सहा. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन देवलापार यांचे पथक पोलीस नायक प्रमोद मडावी, शिवा नागपुरे, पोलीस अंमलदार कांतीचंद हराळ, मनिश चौकसे, विष्णु लहाने, केशव फड यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार अमर झिने करीत आहे.