प्रगटदिनी संपूर्ण रेशीमबाग परिसर गजाननमय !

– श्रींचा १४६ वा प्रगटदिन उत्साहात संपन्न …..

नागपूर :- रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानात समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचा १४६ वा प्रगटदिन भाविकांनी उत्साहात साजरा केला. यंदाही सकाळी ८.३० वाजता श्रींच्या रथयात्रेचा नामस्मरण पालखीचा शुभारंभ नरकेसरी प्रकाशन चे अध्यक्ष डॉ विलास डांगरे,माजी आमदार  नागो गाणार, यांचे शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी श्रद्धास्थानाचे संयोजक गिरीश वराडपांडे , डॉ मुकुंद पांडे, डॉ श्रीरंग वराडपांडे आणि गजाननभक्त उपस्थित होते.

महिला भाविकांनी श्रींच्या रथयात्रेच्या मार्गात सडे शिंपडून, रांगोळ्यांनी सुशोभीत करून श्रींच्या रथावर पुष्पावृष्टीचा वर्षाव करण्यात आला, भाविकांनी श्रींच्या मुळ प्रतिमेला औक्षवाण व पुजन केले .या पालखीत श्री गजानन जय गजानन , गण गण गणांत बोते , ओम गजानन नमो नम , गुरु गजानन माझे आई मजला ठाव द्यावा पायी , आदी मंत्रांच्या गजराने रेशीमबागेतील वातावरण शेगावमय झाले, भाविकांनी ठिकठिकाणी श्रींच्या रथयात्रेचे फुलांची सजावट, गेट सजवून तसेच पालखी श्रधास्थानात आल्यावर आमदार मोहन मते यांनी पालखीचे भव्य स्वागत केले. दुपारी १२ वाजता श्रींना लघुरुद्राभिषेक करून मंगल आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. या उत्सवासाठी अशोक भेंडे , दीपक वाळके,नरेश ईटनकर, अरविंद पिट्टलवार, मोहन रसेकर, श्रीदादाराब गाकरे , दीपाली निमजे,भारती वाळके,चित्रा मानकर,सुनीता धाराशिवकार,गीता मौदेकर, आदी समस्त भाविकावृंदानी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"शिखर 24" का सफल आयोजन

Mon Mar 4 , 2024
नागपुर :- गुरुनानक इंस्टीट्यूशन, नागपुर द्वारा संचालित GNIET, GNIHM & GNIT कॉलेज के वार्षिक सम्मेलन “शिखर 24” का सफल आयोजन किया गया। इस कार्यक्रम के अंतर्गत विद्यार्थियों ने विविध सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमों की प्रस्तुति की गई। साथ ही विविध खेल प्रतियोगिता का आयोजन किया गया। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में अमृतपाल सिंह अलग (सिख एजुकेशन सोसाइटी के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com