नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार दि. 28 फेब्रुवारी रोजी नागपूर आणि यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.
दुपारी 2.15 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॅाप्टरने जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅड यवतमाळकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅड, यवतमाळ येथे आगमन व राखीव. दुपारी 4.25 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती. प्रधानमंत्री महोदयांसमवेत मोटारीने डोरलीकडे प्रयाण. दुपारी 4.45 ते 5.45 वाजेपर्यंत नागपूर रोडवरील डोरली येथे प्रधानमंत्री महोदयांसमवेत यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5.50 वाजता प्रधानमंत्री महोदयांसमवेत मोटारीने यवतमाळ हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता यवतमाळ हेलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 6.05 वाजता प्रधानमंत्री महोदयांच्या प्रस्थानप्रसंगी उपस्थिती. सांयकाळी 6.15 वाजता मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.