माळी समाजाला भाजपने निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यावे – रवींद्र अंबाडकर 

नागपूर :- माळी समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येत असून टक्केवारी लक्षात घेता लोकसंख्या 12% आहे तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 7 ते 15 टक्के माळी समाजाचे मतदार आहे. परंतु आजपर्यंत भाजपने माळी महासंघाला प्रतिनिधित्व दिले नाही. भाजपने दरवेळेस निवडणुकीत माळी, धनगर, वंजारी, यांच्या नावाचे नारे देऊन मत घेतली. पण माळी समाज लोकसभेत प्रतिनिधित्वपासून वंचित राहिला. महाराष्ट्रात 7 लोकसभा आणि 37 विधानसभेमध्ये माळी मतदारांची संख्या 15 टक्के आहे तर 5 लोकसभा 55 विधानसभेत माळी समाज हा उमेदवाराचा विजय निश्चित करतो. तरीही माळी समाजाला डावलले जाते. अकोला लोकसभा मतदारसंघात 12 टक्के माळी समाज असून ॲड. विशाल प्रभाकर गणगणे हे प्रतिभावान युवा उमेदवार आहे. आणि भाजपा मध्ये अतिशय सक्रिय आहे. त्यामुळे त्यांचा विचार व्हावा. असे आवाहन माळी महासंघाचे महासचिव रवींद्र अंबाडकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वार्षिक आमसभेत गाजला रणाळ्याच्या बिअर बार व दारू दुकानाचा मुद्दा

Fri Feb 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी पंचायत समितीची वार्षिक आमसभा विविध विषयांवर गाजली…  -सर्व समस्या निकाली काढा अधिकाऱ्यांना आमदार टेकचंद सावरकर यांचे निर्देश… कामठी :- आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली रणाळा येथील साबळे सेलिब्रेशन सभागृहात संपन्न झालेल्या कामठी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत 26 जानेवारीला संपन्न झालेल्या ग्रामसभेत कुठल्याच दारु दुकाने तसेच बिअर बाल ला ना हरकत प्रमाणपत्र देऊन परवानगी देण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!