अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन

पुणे :- केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व जिमखाना सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल स्पर्धांचे २०२३-२४ चे १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाचे सचिव सुजीतकुमार मिश्रा यांच्यासह सचिवालय जिमखान्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप २२ फेब्रुवारी राजी सायं. ४ वा. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सचिवालय जिमखान्याचे मानद सह सचिव तथा स्पर्धा सचिव सुनिल आगरकर यांनी दिली आहे.

या स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यातून ४५ संघ उपस्थित राहणार असून स्पर्धेकरिता पंच व अन्य तांत्रिक सहकार्य महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेकडून लाभणार आहे, असेही आगरकर म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देशाच्या राष्ट्रीय कोळसा निर्देशांकात डिसेंबर, 2023 मध्ये 4.75% ची घसरण

Thu Feb 15 , 2024
नवी दिल्ली :- देशाच्या राष्ट्रीय कोळसा निर्देशांकामध्ये (तात्पुरत्या) डिसेंबर 2023 मध्ये 4.75% ची लक्षणीय घसरण झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये 163.19 अंकांवर असलेला हा निर्देशांक डिसेंबर 2023 मध्ये 155.44 झाला आहे. निर्देशांकातील ही उल्लेखनीय घसरण कोळशाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी देशात कोळशाचा पुरेसा साठा असल्याचे दर्शवते राष्ट्रीय कोळसा निर्देशांक (एनसीआय) हा एक दर निर्देशांक असून तो अधिसूचित दर, लिलाव दर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com