नागपूर :- जुन्या वर्तमानपत्राची रद्दी आहे त्या स्थितीत विक्री करावयाची असल्याने माहिती व जनसंपर्क कार्यालयातर्फे इच्छुक खरेदीदाराकडून दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे. सदर दरपत्रक 12 फेब्रुवारी 2024 रोजीच्या दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहे.
दरपत्रकाबरोबर अनामत रकम रुपये 500 जमा करणे बंधनकारक असून नामंजूर झालेल्या दरपत्रकधारकांना अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे. प्राप्त दरपत्रक संबंधितांसमोर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी चार वाजता उघडण्यात येतील. यासंबंधीच्या अटी व शर्ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जुने सचिवालय, सिव्हील लाईन येथे कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी वर्तमानपत्राची रद्दी खरेदीसाठी आपल्या निविदा सादर कराव्या, असे आवाहन सहायक संचालक पल्लवी धारव यांनी केले आहे.