आरसीएस उडान योजनेअंतर्गत 519 हवाई मार्ग कार्यान्वित

– या योजनेंतर्गत 2 वॉटर एरोड्रोम्स आणि 9 हेलीपोर्टसह 76 विमानतळ कार्यान्वित

नवी दिल्ली :- प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना (आरसीएस) – उडे देश का आम नागरिक (उडान) सुरू झाल्यापासून एकूण 519 हवाई मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत.

उडान योजनेंतर्गत सध्या 2 वॉटर एरोड्रोम्स आणि 9 हेलीपोर्टसह 76 विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. आरसीएस अंतर्गत उड्डाणे चालवण्यासाठी 4 विमानतळ तयार आहेत. 09 विमानतळ/हेलिपोर्टची विकासकामे पूर्ण झाली असून परवाने देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उडान योजनेंतर्गत 17 विमानतळ/हेलिपोर्टची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित विमानतळांच्या विकासाचे काम नियोजनाच्या टप्प्यात आहे.

जेट एअरवेज, झूम एअर, ट्रूजेट, डेक्कन एअर, एअर ओदीशा यासारख्या काही विमान कंपन्या बंद पडणे,

अधिक देखभाल खर्च, प्रशिक्षित वैमानिकांची कमी उपलब्धता ,3 वर्षांचा व्हीजीएफ कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे देशात एमआरओ सुविधांचा अभाव,विमानांचा तुटवडा, सुटे भाग आणि इंजिनांची कमतरता आणि कमी पीएलएफ इ. अशा विविध कारणांमुळे सध्या 2 वॉटर एरोड्रोमसह 18 विमानतळ तात्पुरते बंद आहेत.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंह (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांचे उत्तर

Tue Feb 6 , 2024
– “राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून भारताच्या प्रगतीचा वेग आणि व्याप्ती दिसून आली “ – “घराणेशाहीचे राजकारण हे भारताच्या लोकशाहीसाठी चिंतेचे कारण आहे” – “तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची हमी आहे.” – “पहिल्या कार्यकाळात आम्ही आधीच्या सरकारांनी केलेले खड्डे भरत राहिलो, दुसऱ्या कार्यकाळात आम्ही नवभारताची पायाभरणी केली , तिसऱ्या कार्यकाळात आम्ही विकसित भारताच्या निर्मितीला गती देऊ” – […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!