नागपूर :- निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व आयकर पात्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत लिंक करावे, असे वरिष्ठ कोषगार कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षामध्ये आयकर अधिनियम २०६AA अन्वये एकूण उत्पन्नाचे निवृत्तीवेतातून २० टक्के दराने सरसकट आयकर कपात करण्यात येईल. तसेच त्यांचा फार्म नंबर १६ देता येणार नाही . निवृत्तीवेतन धारकांनी लवकरात लवकर पॅनकार्ड आधार सोबत लिंक करावे असे, वरिष्ठ कोषगार कार्यालयाच्या सहायक संचालक मोनाली भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.