पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील श्याम नगर व नवीन नगर पारडी परिसरात आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या खडीकरणाचे भूमीपूजन संपन्न

नागपूर :- दि. 17 जानेवारी 2024 रोजी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील शाम नगर व नवीन नगर परिसरात गल्ली क्र. 1. 2. 3. 4 व 5 येथे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद तथा आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या शुभहस्ते त्यांच्याच आमदार निधीतून मंजूर झालेल्या 10 लाख रूपयाच्या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे भूमीपूजन ब्लॉक अध्यक्ष  युवराज वैद्य तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.

आमदार ॲड. अभिजित वंजारी नागपूर शहरातील विविध समस्यांचे निराकरणाकरिता व सुविधा उपलब्ध करण्याकरिता सातत्याने शासनाकडे व स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करून शहरांचा सर्वांगीण व जलद विकास करण्याच्या दृष्टिने सतत प्रयत्नशील आहेत. पूर्व नागपुरातील शाम नगर व नवीन नगर परिसरात लोकांना जाण्यायेण्याकरिता चांगले रस्ते उपलब्ध नसल्यामुळे या परिसरातील लोकांना पावसाळ्याच्या दिवसात अतिशय त्रास होत होता. याकरिता लोकांच्या मागणीनुसार आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी आमदार निधीतून या परिसरातील रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाकरिता रु. 10 लाख मंजूर करून रस्त्याच्या खढीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.

याप्रसंगी पृथ्वी मोटघरे, आशिष सेलोकर संजू शरणागत, सागर टाले, उमरावजी रिठे, बाबा बिसेन, राजू गोटे, पंकज लांबट, जितू राऊत, अनिल लुटे, हरिष शाहू, मदन रिठे, रूपेश जुमळे, छगन सुर्यवंशी, मोरेश्वर माहूरकर, संपत किन्नाके, नरेंद्र कनोजे, घनश्याम येनुरकर, महेश नागपुरे, विक्की आपतुरे, दुर्गेश, ओंकार, लाला ठाकरे, संतोष पटले, रामेश्वर बिसेन, कैलास बावणकर, मोराज वर्मा, भोजराज पटले, सिंदीमेश्राम तसेच श्याम नगर व नवीन नगर परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव : तलवारबाजी स्पर्धा

Thu Jan 18 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तलवारबाजी स्पर्धेचा समारोप झाला. संगम टॉकीज जवळील बास्केटबॉल मैदानात स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. 14 वर्षाखालील मुले व मुली आणि सीनिअर मुले व मुलींच्या गटात फॉईल, ई.पी., सायबर या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. चारही गटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. निकाल (अनुक्रमे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com