राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धा १२ जानेवारीपासून

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे पाच स्पर्धांचे यजमानपद

नागपूर :- राज्यपाल कार्यालयाच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाचे रौप्य वर्षीय यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भुषविणार आहे. नागपूरात १२ जानेवारी पासून या क्रीडा महोत्सवाला प्रारंभ होणार असून १६ जानेवारी २०२४ पर्यंत राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पाच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार, १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. उद्घाटनिय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस हे अध्यक्षस्थानी राहतील. विशेष आकर्षण म्हणून पद्मश्री, अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त माजी आंतरराष्ट्रीय कब्बडीपटू सुनील दवास यांची उपस्थिती राहणार असून स्पर्धेचे उद्घाटन करतील. तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची उपस्थिती राहणार आहे.

राज्यपालांचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महिला गटातील नऊ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाकडे देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मुला-मुलींच्या अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, टेबलटेनिस, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन या पाच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे. तर मुला-मुलींच्या गटात कबड्डी, खो-खो, फुटबॉल आणि बुद्धिबळ या चार स्पर्धांचे आयोजन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ करणार आहे.

नागपूरातील क्रीडा स्पर्धांचे आयोजन १२ ते १६ जानेवारी २०२४ करण्यात येणार आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्याचा मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तिसऱ्यांदा मिळाला आहे. या क्रीडा महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील तब्बल २३ विद्यापीठाचे खेळाडू सहभागी होणार आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणारे (रायगड), डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ. होमीभाभा राज्य विद्यापीठ मुंबई, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई, केकेकेएस विद्यापीठ, रामटेक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक, म. फुले कृषी विद्यापीठ, राहूरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड, संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, मुंबई विद्यापीठ मुंबई, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचा समावेश आहे.

विद्यापीठाकडे तिसऱ्यांदा यजमानपद

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यंदा राज्य क्रीडा महोत्सवाचे यजमानपद भुषवित आहे. या स्पर्धांचे यजमानपद भुषविण्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तिसरे वर्ष आहे. पहिल्यांदा १९९९ मध्ये विद्यापीठाकडे या स्पर्धेची जबाबदारी मिळाली होती. यानंतर २०१२ मध्ये विद्यापीठाने दुसऱ्यांदा यजमानपद भुषविले, आणि २०२३ मध्ये तिसऱ्यांदा या स्पर्धा आयोजनाचा मान विद्यापीठाला मिळाला आहे.

सुनील दबास यांच्या विषयी

सुनील दबास ह्या भारताच्या राष्ट्रीय महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक आहेत. २०१२ मधील आशियाई खेळ आणि २०१२ मधील विश्व कपासह सात आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांनी संघाला प्रशिक्षित केले. भारत सरकारने २०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार आणि २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. २००५ पासून सुनील दबास राष्ट्रीय महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वात संघाने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ७ सुवर्णपदक जिंकले आहेत. ज्यामध्ये २००६ मधील दक्षिण आशियाई खेळ, २००७ मधील दुसरी आशियाई चॅम्पियनशिप, २००९ तिसरी आशियाई चॅम्पियनशिप, २०१० मधील दक्षिण आशियाई खेळ, २०१२ मधील महिला कबड्डी विश्व कप आणि २०१३ मधील इनडोअर आशियाई खेळांचा समावेश आहे. भारत सरकारने त्यांना खेळ प्रशिक्षणात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबाबत द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले. असा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या हरियाणा राज्यातील पहिल्या महिला प्रशिक्षक आहेत. २०१४ मध्ये सुनील दबास यांना भारताच्या चवथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री ने सन्मानित केले आहे. हरियाणा सरकारने स्पोर्ट्स वूमेन अचीवर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, सिनेट सदस्य डॉ. संजय चौधरी, वैद्यकीय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ. धनंजय वेळूकर, सदस्य डॉ. मनोज आंबडकर, डॉ. नितीन जंगीटवार,‌ डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. आदित्य सोनी, डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. अर्चना कोट्टेवार, डॉ. माधवी मार्डीकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

किंग कोबरा आर्गेनाइजेशन यूथ फोर्स ने की जनता से मौत के फंदे नायलॉन मांझे को बहिष्कार करने की अपील

Fri Jan 12 , 2024
नागपूर :- दिनांक 12/01/2024 नागपुर महाराष्ट्र के विभिन्न स्कूल कालेज धार्मिक स्थलों और भीड़भाड़ वाले इलाकों में मुख्य चौराहों पर सामाजिक संगठन किंग कोबरा आर्गेनाइजेशन यूथ फोर्स द्वारा संस्थापक अध्यक्ष अरविंद कुमार रतूड़ी के नेतृत्व में इंसान पशु पक्षियों जीव जंतुओं के जीवन और जान-माल के लिए काल बन चुके पंतग उड़ानें की प्रतिबंधित चीनी डोर नायलॉन मांझा के इस्तेमाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com