मोटरसायकल चोरी करणारे आरोपी पोलीस स्टेशन सावनेर यांच्या जाळयात

सावनेर :-फिर्यादी नामे प्रितम केशव पारधी, रा. डब्ल्यू सो एल कॉलनी वाघोडा ता. सावनेर हा दिनांक २७/१२/२०२३ रोजी सायंकाळी १७.०० वा. सुमा. WCL स्टेडियम वाघोडा येथे आपली स्वतःची एक हिरो होण्डा पॅशन एर्नेस मो.सा. :MH 40 C 1085 बाहेर ऊभी करून रनिंग प्रक्टिस करीता मैदानात गेला असता रनिंग प्रक्टिस करून घरी जाण्याकरीता परत आपली मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी आला असता त्याला त्याची मोटरसायकल ही ठेवलेल्या ठिकाणी दिसली नाही. आजू बाजु परीसरात शोधले असता मिळून न आल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

पोलीस स्टेशन सावनेर येथील डी. बी. पथक यांनी मोटार सायकल चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेवुन आरोपी नामे- १) नकुल हजारो पहाडे, वय २५ वर्ष राह. शक्ती नगर झोपडपट्टी आगेवाडा ता. सावनेर (२) सुनील रामसजीवन केसकर, वय ३९ वर्ष राह, बंदर कॉलोनी पोस्ट, खडसंगी ता. चिमुर जि. चंद्रपुर ह. मु. बजाज कॉलोनी वाघोड़ा ता. सावनेर जि. नागपुर यांना अटक करून गुन्हयातील चोरीस गेलेली एक हिरो होण्डा पॅशन प्लस मो.सा.क्रः MH 40 C 1085 आरोपीतां कडून जप्त करण्यात आली असुन गुन्हा उघडकीस करण्यात आला असुन वरील दोन्ही आरोपीतांचा पी सी आर घेवुन आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सदरची कार्यवाही ही सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, सहायक फौजदार गणेश रॉय, पोलीस हवालदार रवि मेश्राम, पोलीस अंमलदार दाउद मोहम्मद यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना अटक

Mon Jan 1 , 2024
कन्हान :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर मौजा गाडेघाट रोड सुनिल सलून दूकानाचे समोरील रोडवर दिनांक २७/१२/२०२३ चे १०.४० वा. ते ११.२० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे सैय्यद शाहरूख रेशमा सैय्यद, वय २६ वर्ष, रा. अशोक नगर वार्ड क्र. ०५ कन्हान हा त्याचे मित्रसह घटनास्थळी बसुन बोलत असतांना दोन मोटर सायकलवर प्रत्येकी ०३ असे ६ लोक हातात चाकू आणि दंडे घेवून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!