महाराष्ट्रात तिसरी राजकीय आघाडी 50 पक्षांना सोबत घेऊन लोकसभा व विधानसभा निवडणूक लढणार – बावने

– मुंबई येथील राजकीय पक्षाच्या बैठकीत भारतीय जन आघाडीची घोषणा

मुंबई :- महाराष्ट्रात सत्ता टीकविण्याकरीता सत्ताधारी आपली सर्व ताकद पणाला लावत असून दुसरी कडे महाराष्ट्रातील जनतेकडे हे सरकार दुर्लक्ष करून मतदाराच्या भावना सोबत खेळत आहेत सरकारने जनतेला दिलेली अभिवचने पूर्ण करण्यास हे सरकार नाकाम झाली असून ओबीसी, शोषित, वंचित, भटकेविमुक्त, मागासर्गीया, अल्पसंख्यांक, शेतकरी, कामगार, महिला यांना त्यांचे न्याय हक्क मिळून देण्याकरिता तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली असून या आघाडीत महाराष्ट्रातील सर्व स्तरातील वेगवेगळ्या भागातील राजकीय पक्ष व संघटना एकत्र आल्या आहेत अशी माहिती आघाडी चे प्रमुख निमंत्रक भारतीय जन सम्राट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब तथा राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आघडीचे संयोजक राजेंद्र वनारसे यांनी मुंबई येथे सोमवार दिनांक 18 डिसेंबर 23 रोजी मराठी पत्रकार सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली या बैठकीत महाराष्ट्रातील ५० राजकीय पक्ष यांनी भारतीय जन आघाडी स्थापनेस मंजुरी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने लवकरच आघाडीच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून लोकसभा उमेदवार आणि विधानसभेच्या उमेदवाराची चाचपणी करण्याची तयारी करण्यात येणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात आघाडीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे नंतर आझाद मैदांन येथे महामेळावा घेणार असल्याची माहिती भाऊसाहेब बावणे यांनी दिली महाराष्ट्रात सरकार कोण बनविणार ही सत्ता समीकरणे तिसरी आघाडीतील पक्ष सर्वांची गणित बदलविणार यात शंका नाही.

महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा आणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटीत आणी एकत्रित लढण्या करीता महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणी संघटना यांना आवाहन करण्यात आले होते. आवाहनाला प्रतिसाद देत 50 राजकीय पक्ष आणी संघटना एकत्र आल्या असुन त्यांनी आघाडी ला संमती दिली आहे.भारतीय जन आघाडी या नावाने आघाडीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे

ही आघाडी स्थापन करण्या करीता आघाडीचे संयोजक राजेंद्र वनारसे तथा निमंत्रक भाऊसाहेब बावने यांच्यासह ओबीसी एन टी पार्टी चे अध्यक्ष संजय कोकरे,बाळासाहेब साबळे यांची भुमीका महत्वाची असुन या आघाडी करीता सर्वच घटक पक्ष आणी संघटना यांनी सुध्दा प्रयत्न केले आहेत या आघाडीत खालील पक्ष आणी संघटना यांनी भारतीय जन आघाडी स्थापनेच्या ठरावाला एकमताने मंजुरी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस स्टेशन सावनेर, खापा, केळवद हृददीतील मोटार सायकली चोरणारा आरोपी पोलीसांनी घेतले ताब्यात, आरोपीकडून जप्त करण्यात आले एकूण ४ मोटर सायकली

Tue Dec 19 , 2023
सावनेर :- पोलीस स्टेशन वे हददीत मागील काही महिन्यात झालेल्या मोटार सायकली चोरी वे गुन्हे उघडकीस आणणे कामी पोस्टे. चे डी.वी. पथक हे मोटार सायकली चोरी करणारे इसमांचा हालचालीवर विशेष लक्ष्य ठेवुन असता पोस्टे, परीसरात गस्त करीत असतांना एक इसम हा संशयीत रित्या दिसुन आला त्यास पकडण्याचा प्रयत्न केले असता तो पोलीसांना पाहुन पळु लागला पोलीसांनी त्याचा मोठ्या शिताफितीने पाठलाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!