नागपूर :- मागील आठ वर्षांपासून समाजातील गरजू विद्यार्थासाठी एक वही, एक पेन अभियानच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या महामानव प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या अविरत कार्याची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती, महात्मा फुले सावित्रीबाई फुले जयंती, गणेशोत्सव नवरात्रौत्सव, महापुरूषांच्या जयंत्या तसेच महापरीनिर्वाण दिनी हारफुलांसोबतच वह्या पेन व अन्य शैक्षणिक वस्तूंनी साजरा करण्याचे व जमा झालेले साहित्य समाजातील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आवाहन महामानव प्रतिष्ठानच्या वतीने एक वही एक पेन अभियानांतर्गत करण्यात येते. प्रतिष्ठानच्या वतीने मागील आठ वर्षात हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचा लाभ मिळवून दिला आहे .
सदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजू झनके यांच्या या करायची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी दखल घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येणारे अभियान चालवून या विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहात ही प्रशंसनीय बाब आहे राज्य सरकारने पहीली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तसेत पुस्तकांसोबतच वह्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे़ समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये ही आमच्या सरकारची व शालेय शिक्षण विभागाची भूमिका आहे असे केसरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले .
आपली संस्था देखील गरजु विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे आपण ५ व ६ डिसेंबर २०२३ रोजी डाॅ बाबालाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी चैत्यभूमी परीसरात एक वही एक पेन अभियानचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला येण्याचे नियोजन केले असतानाही काही तांत्रिक बाबींमुळे मला उपस्थित राहता आले नाही याची खंत राहील अशा भावना व्यक्त करीत केसरकर यांनी एक वही, एक पेन अभियानसाठी शुभेच्छा दिल्या