संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुरेश नगर,भाजी मंडी कामठी रहिवासी अल्पभूधारक शेतकरी व जोडधंदा म्हणून दुग्धव्यसायासह म्हशी खरेदी-विक्री चे व्यवसाय करणारे मोठे व्यावसायिकाने आर्थिक टंचाईला कंटाळून राहत्या घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री आठ दरम्यान घडली असून मृतकाचे नाव जलील कुरेशी वय 50 वर्षे रा कुरेश नगर,भाजी मंडी कामठी असे आहे.
प्राप्त माहिती नुसार सदर मृतक हा अल्पभूधारक शेतकरी असून जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायासह म्हशी खरेदी विक्री चा व्यवसाय करीत बाजारपेठेत मोठे व्यवसायिक म्हणून उदयास आले होते.मागिल काही काळापासून विविध संघटनेकडून होत असलेला आक्रमक पवित्रा व त्यातच प्रशासनाची बळजबरी पणामुळे म्हशी खरेदी विक्री व्यवसायाला तडा जाऊन मोठे आर्थिक नुकसान नुकसान होत होते अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाहासह व्यावसायिक जवाबदारी पार पाडण्यात होत असलेल्या अडथळा लक्षात घेत सदर मृतक अल्पभूधारक शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेत आत्महत्येचा निर्णय घेतला परिणामी काल रात्री 8 वाजता आपल्या राहत्या घरातील खोलीत छताच्या लोखंडी हुक ला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या करीत जगाचा शेवटचा निरोप घेतला.मात्र या घटनेने कुरेशी समुदायात शोकमय वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या बळजबरीपणा व विविध संघटनेद्वारे घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे एका व्यवसायिकावर आलेल्या आत्महत्येच्या पाळीमुळे स्थानिक प्रशासन तसेच आक्रमक पवित्रा घेणाऱ्या विविध संघटने विरोधात नाराजगीचा सूर वाहत असून सर्वत्र रोष पसरला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतकाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करीत मुस्लिम कब्रस्तान कामठी येथे दफनविधी अंत्यसंस्कार करण्यात आले .पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे बराच मोठा आप्तपरिवार आहे तर या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबासह परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे. तसेच प्रशासनाचा बळ जबरीपणा व विविध संघटनेकडून होणाऱ्या आक्रमक भूमिकेमुळे सदर आत्महत्येसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी कुरेशी समुदायाकडून करण्यात आली आहे.