कामगार मोर्चा ने साजरा केला संविधान दिवस आणि मन की बात

गोंदिया :- येथील प्रभाग क्रमांक सहा, गांधी वार्ड इथे कामगार मोर्चा भाजप गोंदिया जिल्हा व्दारा २६ नोव्हेंबर ला सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा *मन की बात* कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित माजी नगरसेविका भावना कदम, माजी नगरसेविका सुनिता तरोणे, पुर्व विदर्भ कामगार मोर्चा चे अध्यक्ष धनंजय वैद्य, सहकार आघाडी चे अध्यक्ष दिपक कदम, का. मो. जिल्हा सचिव अंकुश वैद्य सह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान दिनाच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन संविधानाचे पुजन करण्यात आले. सायंकाळी लहान मुलांनी संविधान या विषयावर भाषण केले आणि सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम गणवीर, संदिप डोंगरे, क्षितीज वैद्य, विशाल बन्सोड, प्रदिप डोंगरे, जावेद पठाण यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रशांत डोंगरे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

Wed Nov 29 , 2023
मुंबई :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!